गदिमा नवनित
  • जसा जन्मतो तेज घेऊन तारा!जसा मोर घेऊन येतो पिसारा!
    तसा येई घेऊन कंठात गाणे!असा बालगंधर्व आता न होणे!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • ईश्वराचा अंश
  • Esvaracha Ansha
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    ज्ञनियाचा वा तुक्याचा
    तोच माझा वंश आहे
    माझ्या रक्तात थोडा,
    ईश्वराचा अंश आहे.
    देहाची कुटी रिकामीच टाकून.
    मी त्रिकाल हिंडत असतो.
    कालाने बुडवून टाकलेल्या गुंफा,
    आटाआटीने धुंडत असतो.
    झाडेझुडपे तोडून,
    पाषाणीचे लिंपण फोडून,
    त्या गुंफा मी मोकळ्या करतो.
    कल्पनेला सुचणार नाहीत-
    अशी शिल्पे पाहुन,
    बेभान होतो.
    आणि असंख्यात भोळ्या डोळ्यांसाठी,
    मी पायर्‍या कोरु पाहतो,
    पर्वताच्या पोटात.
    त्या कोरता कोरता
    मलाही सहज साधून जाते,
    एखादे शिल्प.
    येणे-जाणे सुरु होते, यात्रिकांचे,
    मात्र
    पात्रापात्रतेच्या विचारावाचून-
    कुणी
    देव म्हणुन
    फुले वाहतात माझ्याच शिल्पावर
    तेव्हा मी बावरतो.
    हातातील कुर्‍हाड,कुदळ,
    फेकून देतो
    वर्तमानाच्या डोहात.
    पण आश्चर्य!
    ती ओबाडधोबाड
    पोलादी आयुधे,
    बुडत नाहीत पाण्यात,
    तरंगासारखी
    तरंगत राहतात.


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems