गदिमा नवनित
  • विठ्ठलाचे पायी थरारली वीट, उठला हुंदका देहुच्या वार्‍यात,तुका समाधीत चाळवला.
    संत माळेतील मणी शेवटला,आज ओघळला एकाएकी....
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • एक पांखरु
  • Eka Pakharu
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    ऐन वयाच्या वसंतकाली
    फिरे सुरंगी कळ मखमाली

    सादावांचुन उभवित पंख
    कळीकळीवर मारी डंख
    आकाराविन दिसे पांखरु

    हळूंच लागे गंध पोखरुं!

    अलगद टाकी नसतां भार
    चपल पापणी लवली पार

    गाली बसले केवी उठवूं?
    फुलती लज्ला कैसी मिटवूं?

    मनांत शिरला बाई चोर
    शहारले मी नवखी पोर

    वक्षी त्याची चरणें रुपती
    कमलकळ्यांची अग्रे दुखती

    कटि कंपित हो,गळले पाय
    वेल पांखरा भ्याली काय?

    एक पांखरु बाग थरकवी
    पीडा देतच,फुले हरखवी!


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems