गदिमा नवनित
  • आईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • आंधळ्यांनी का म्हणावे
  • Andhalyanni Ka Mhanave
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बोलु दे लोकां हवे ते, काय लोकांना कळे ?
    आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे ?

    प्रेमवेडा मोर नाचे प्रेमरंगी कौतुके
    पंख तितुके नेत्र होती स्वर्गही खाली झुके
    प्रेमिकांचे विश्व आहे विश्वाहुनी या वेगळे
    आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे ?

    जन्म कैलासात घेते, घे उडी जी भूतळी
    सागरासी अचुक मिळते ती नदी का आंधळी ?
    परत फिरतो ओघ का तो लोक निंदेच्या बळे
    आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे ?

    माझिया प्रेमांधतेला सूर्यचंद्राची दिठी
    आडवे येवोत कोणी मी तुझी रे शेवटी
    बंधने देहास कोटी प्राण माझे मोकळे
    आंधळ्यांनी का म्हणावे प्रेम असते आंधळे ?


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems