गीतगोपाल (संगीत:सी.रामंचद्र) | Geetgopal (C.Ramchandra)
- पं.महादेवशास्त्री जोशी:
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार ! गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.
सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर. - Box-C-20