"श्री.सुमित्र श्रीधर माडगूळकर यांचा थोडक्यात परिचय"
१) गदिमांचे नातू व लेखक आहेत,व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर तथा सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट आहेत,१९९८ साली गदिमांच्या साहित्य-चित्रपटांवर आधारित इंटरनेटवर ''मराठी साहित्यातील'' पहिली Multimedia वेबसाईट गदिमा.कॉम (gadima.com ) त्यांनी तयार केलेली आहे.मराठी भाषा इंटरनेटवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
२) दै.लोकमत,दै.देशोन्नती सारख्या अनेक लोकप्रिय मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्ति व अनेक मराठी वेबसाईटना त्यांनी तंत्रज्ञान सहाय्य दिलेले आहे.
३) पुण्यातील "वसंत व्याखानमाला",पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी चा "पुलोत्सव",महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय या सारख्या मान्यवर संस्थांमध्ये त्यांनी गदिमांच्या गाणी व आठवणींवर "तो राजहंस एक","गदिमान्य " सारखे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
४) दूरदर्शन,ई टिव्ही मराठी,झी मराठी,News18 लोकमत,स्टार माझा सारख्या अनेक वाहिन्यांवर मराठी बातम्या,मानाचा मुजरा,नक्षत्राचे देणे अशा कार्यक्रमात सहभाग.सोनी म्युझिक च्या सहकार्याने 'जोगिया' या मराठी म्युझिक अल्बमची निर्मिती त्यांनी केली होती.सकाळ,लोकमत,महाराष्ट्र टाईम्स सारख्या अनेक वृत्तपत्रातून तसेच लोकप्रिय दिवाळी अंकातून व सोशल मीडियातून त्यांचे लिखाण चालू असते.
५) अँड्रॉइड (Android) मोबाईलवर ''गीतरामायण अॅप'' चे निर्माते,फेसबुकवर गदिमा व गीतरामायण पेज ची निर्मिती,तसेच आठवणीतील गाणी,झगमग.नेट सारख्या वेबसाईटवरुन त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे.
६) ''गदिमा साहित्य कला अकादमी'' या संस्थेच्या माध्यमातून गदिमांचे स्मारक ते पुण्यात उभारत आहेत व त्यांचे साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी इंटरनेट,पेनड्राईव्ह,डिव्हीडी सारख्या माध्यमातून त्यांनी गदिमांचे साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे.
गदिमांच्या नातसून असून,व्यावसायाने अकाउंटंट व काऊंसलर आहेत,दै.सकाळ सारख्या
अनेक वृत्तपत्रांतून लिखाण,गदिमांचे प्रकाशित-अप्रकाशित साहित्य नव्या माध्यमात
नेण्यासाठी पुढाकार.
सल्लागार
कै.श्रीधर माडगूळकर
शीतल माडगूळकर
गदिमांचे ज्येष्ठ पुत्र व लेखक.गदिमा प्रतिष्ठान सारख्या अनेक संस्थांवर कार्यरत होते.
गदिमांच्या स्नुषा असून,प्रकाशिका आहेत,गदिमांच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी संकलन व प्रकाशन केले आहे.
संपर्क | Contact :
श्री .सुमित्र माडगूळकर पंचवटी बंगला,11 पुणे मुंबई रोड,वाकडेवाडी,ग.दि.माडगूळकर भुयारी मार्गा जवळ,हॉटेल कामत/सम्राट जवळ,राजयोग हॉल समोर,पुणे 411003
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..