शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे व गदिमा यांचे चांगले सबंध होते,गदिमा जरी कॉंग्रेस विचारसरणीचे होते तरी बाळासाहेबांना त्यांच्या बद्दल खुप आदर होता कारण गदिमा सर्व पक्षांच्या बंधना पलिकडे होते.
गदिमांचे ज्येष्ठ पुत्र श्रीधर माडगूळकर जेव्हा १९८० साली कॉंग्रेस तर्फे पुण्यात आमदारकीची निवडणूक लढवत होते तेव्हा बाळासाहेब छोटया राज सोबत
त्यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते.तेव्हा चक्क या गदिमा पुत्राला बाळासाहेबांचा पाठिंबा होता!,एका कॉंग्रेस उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा होता तो केवळ गदिमा प्रेमापोटी.
बाळासाहेब एक उत्कृष्ठ व्यंगचित्रकार होते,त्यांच्यातला हा गुण राज ठाकरे यांच्यात आला आहे,तुमच्यासाठी खास राज ठाकरे यांनी गदिमांचे काढलेले हे अर्कचित्र!.
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.