काही मृत्यू मनाला चटला लावून जातात,मा.मीनाताई ठाकरे,शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे,विलासरावजी देशमूख,प्रमोदजी महाजन व आता गोपीनाथजी मुंडे...
१९६७ साली उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातून स.गो.बर्वे विजयी झाले,केंद्र सरकारमध्ये त्यांचा अर्थमंत्री म्हणून प्रवेश निश्चित होता पण दुर्दैवाने त्याच रात्री त्यांचे ह्रदयक्रिया बंद पडून निधन झाले,गदिमांचा व त्यांचा स्नेह होता,एका
पत्रकाराने फोन वर त्यांना प्रतिक्रिया विचारली व गदिमा उत्तरले.....आज गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने त्याच ओळी परत आठवतात...
अजुनी कुंकुमतिलक कपाळी| सत्काराच्या गळ्यात माळा|
राजमान्यता स्वीकाराच्या भरात आहे अजुनी सोहळा|
तोच काय हे घडे अचानक| चैतन्याचे होय कलेवर|
लक्ष मुखातील जपनादाचा होय हुंदका एक अनावर|
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.