गदिमा नवनित
  • आईलाही विसरुन जाती या देशातील पिले अडाणी,चल सोडून हा देश पक्षिणी!
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण आठवणी | Geetramayan Articles
  •  
  • Box-C-34
  • आजही गदिमांच्या 'पंचवटी' जवळच्या 'यवन दर्ग्या' बाहेर रामाची-गीतरामायणाची पोस्टर मोठ्या आनंदाने लावली जातात,पुण्यातील मुस्लिम संघटना एकत्र येऊन पुण्याच्या कलेक्टर ला निवेदन देतात की गदिमांचे स्मारक लवकर व्हावे,बाबरी मशिद प्रकरणानंतर निर्माण झालेली कटुता येथे कुठेच दिसत नाही,मराठी भाषेचे जाणकार असलेल्या मुस्लिम बांधवांना असलेले गदिमांबद्दलचे प्रेम आपण समजू शकतो पण ज्याला गदिमांच्या साहित्याबद्दल कदाचित माहितीपण नसावी अश्या मुस्लिम बांधवांना गदिमांबद्दल इतके प्रेम - आदर का असावा की त्यांनी चक्क रामाची पोस्टर लावावित,असे काय घडले होते?.
  • महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर....
  • साधारणतः १९५३ च्या सुमारास पुण्याला स्वतंत्र नभोवाणी केंद्र निघाले. श्री सीताकांत लाड नावाचे यांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले. नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी यांना खूप आग्रह केला. कातळाखालचा झरा एकदम वर उसळावा, तशी इतके दिवस रामायण लिहिण्याची यांची सुप्त इच्छा वर उसळली. संदर्भासाठी कुठल्याही रामायणाचे एकही पान न उघडता यांनी पहिले गीत लिहिले. गीत रामायणाची छप्पन्न पदे रचताना यांना एक गीत सोडून, कधीच त्रास झाला नाही.
  • गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.