गदिमा नवनित
  • पापण्यांत गोठविली मी नदी आसवांची
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima
  • गदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्मिळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो?,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.

    गदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक दुर्मिळ गाणे छुमछुम छुमछुम नाच मोरा.
  • Box-C-7
  • दिंडी - गदिमांच्या आवाजात
    Dindi - Voice Of Ga.Di.Madgulkar

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • अल्बम: गदिमांच्या आवाजात      Album: Gadima Voice





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • नका थांबवू इथेच दिंडी,डोक्यावरती उन्हे तापली
    कैक योजने दूर येथूनी,बुद्ध वडाची थंड सावली

    नका थांबवू इथेच दिंडी,तळे नव्हेरे दिसते मृगजळ
    तुमची तुमच्या पदी सावली,करील समोरील वारा शीतळ

    नका थांबवू इथेच दिंडी,पालखी संगे अखंड जाणे
    या संताची करी पताका,या संताचे ओठी गाणे

    नका थांबवू इथेच दिंडी,या संतासम मार्गी मरणे
    पिढ्या पिढ्यांचा प्रवास करुनि,ठरल्या जागी तुम्हास जाणे

    नका थांबवू इथेच दिंडी, या संताची उचला विणा
    नसो नाहीतर त्याची वाणी,पुढे चालवा त्याचा बाणा

    नका थांबवू इथेच दिंडी,कलेवरावर वाहत बुक्का
    वैकुंठी हा गेला वैष्णव,उरली मागे पहा पताका


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs