गदिमांच्या आवाजात कविता,व्याख्यान | Poems & Speech Of Gadima
गदिमांच्या आवाजात त्यांच्या कविता व त्यांचे भाषण ऐकणे हा दुर्मिळ योग,जोगिया,जत्रेच्या रात्री व पूजास्थान या तीन कविता ऐका गदिमांच्याच आवाजात,तसेच पेण येणे गणेशोत्सव मंडळात गदिमांनी केलेले एक तासाचे दुर्मिळ भाषण मी कवी कसा झालो?,मराठी भाषा,आपली मराठी संस्कृती,संस्कार या पासून ते गदिमांच्यातला कवी कसा घडत गेला हे ऐका गदिमांच्या या सुंदर व्याख्यानातून.
गदिमांच्या पत्नि विद्याताई यांचा आवाज सुंदर होता,गदिमा-सुधीर फडके यांचे पहिले रेकॉर्ड झालेले गाणे विदयाताईंनी गायले होते.पुढे गदिमांसाठी त्यांनी आपल्या या गानकलेचा त्याग केला व गदिमांची गृहिणी-सखी-सचीव हीच भूमिका शेवटपर्यंत निभावली.गदिमा स्व:ता म्हणतात हे यश माझे नाही तूझे आहे,विदयाताईंच्या आवाजातले हे एक दुर्मिळ गाणे छुमछुम छुमछुम नाच मोरा.
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
गदिमांच्या पत्नि विद्याताई माडगूळकर (पद्मा पाटणकर) यांच्या आवाजातील हे गाणे "हासे नाचे नभी चंद्रकोर"
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.