पं.महादेवशास्त्री जोशी: गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हंटला,तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार ! गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसताना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकवाला जातांना गळ्यात रुठवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल.
सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.
Box-C-20
निराधार मी भीरु भगिनी
Nako Re Maru Navajata
गीतकार: ग.दि.माडगूळकरLyricist: Ga.Di.Madgulkar
संगीतकार: सी.रामचंद्रMusic Composer: C.Ramchandra
गायक: प्रमिला दातारSinger: Pramila Datar
अल्बम: गीतगोपालAlbum: GeetGopal-CR
MP3 player is mobile compatible (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
या गीताचे शब्द लवकरच उपलब्ध होत आहेत,कृपया या पानाला पुन्हा भेट द्या, तोपर्यंत आपण हे गाणे ध्वनिरुपात ऐकू शकता.
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.