पुण्याची 'फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया',भारत सरकारची एक नामांकीत संस्था, जया भादुरी,शबाना आजमी,शत्रुघ्न सिन्हा,टॉम अल्टर, नसीरूद्दीन शाह,ओमपुरी सारखे दिग्गज कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला देणारी.आजही देश-विदेशातून अनेक विद्यार्थी येथे चित्रपट सृष्टीसंबंधी अभ्यासक्रम शिकायला येतात.
याच परिसरात एक 'Wisdom Tree' (बोधीवृक्ष) नावाचे झाड खूप प्रसिद्ध आहे.कॅंपसच्या मध्यभागी असलेले हे
झाड साधारण ७०-८० वर्षे तरी जुने असेल,या झाडाच्या फांद्या सर्व दिशांना पसरुन कॅंपसच्या बिल्डिंगना स्पर्श करतात.भगवान बुध्दांचा 'बोधीवृक्ष',न्युटनचे 'सफरचंदाचे झाड' जितके प्रसिध्द आहे तितकेचे हे झाड FTII व हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिध्द आहे.इतकेच काय तर परिक्षांच्या काळात मुले त्या खाली अभ्यासाला बसतात व मार्कात फरक पडतो असेही तिथे प्रचलित आहे!.अनेक चर्चा त्या झाडाखाली रंगतात,प्रोफेसर्स आपले क्लासेस त्या झाडाखाली घेतात,इतकेच काय तर आता Wisdom Tree Festival सुध्दा दरवर्षी भरते व हिंदी चित्रपटसृष्टीतले मोठे मोठे कलावंत पुण्यात यावेळी आपली हजेरी लावतात.
आता सगळयात मोठी गंमत!,या झाडाला 'Wisdom Tree' (बोधीवृक्ष) नाव दिले आहे कोणी तर अर्थातच ग.दि.माडगूळकर यांनी!,ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते राम गबाले हे फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये अनेक वर्षे शिकवत होते उप-प्राचार्य पदापासून अनेक मोठी पदे त्यांनी या संस्थेत भूषविली होते,त्यांनीच सांगीतलेली ही कथा!.
FTII,Pune ची मूळ जागा प्रभातची,ही संस्था होण्याआधी तिथे प्रभात स्टुडिओ होता,साधारण १९३४ च्या सुमारास अत्याधुनिक अशा प्रभात स्टुडिओची निर्मिती पुण्यात झाली,अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे शुटींग तेथे झाले आहे.गदिमा,पु.ल.देशपांडे या सारख्या अनेक दिग्गजांनी तेथे काम केले आहे.
एक दिवस तेथे गदिमांचे शुटींग चालू होते,नित्य-नियमाप्रमाणे चित्रपटाचे गीत लेखनाचे काम गदिमांकडे होते,पण मनासारखे गाणे काही जमत नव्हते शेवटी गदिमा वैतागून एका झाडाखाली जाऊन बसले व सगळ्यांना सांगीतले की मला एकट्याला काहीवेळ शांतपणे राहुद्यात,गंमंत म्हणजे काही वेळातच गदिमांना गाणे सुचले,हा अनुभव त्यांना एकदाच नाही तर अनेकदा आला,व मराठी चित्रपटसृष्टीतील बुद्धिवंतांच्या मैफिली तेथे जमू लागल्या.गदिमांनी गमतीने या झाडाला 'बोधीवृक्ष' संबोधायला सुरवात केली व हळूहळू ते नाव प्रचलित झाले.
१९५३ साली प्रभात स्टुडिओ बंद झाला व भारत सरकारने ही जागा विकत घेऊन या जागी 'फिल्म ऐंड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया' ची सुरवात केली व गदिमांचा बोधीवृक्ष 'Wisdom Tree' या नावाने प्रसिध्द झाला व आहे तो आजगायत!.
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....