गदिमा नवनित
  • सार्‍या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर
    जीव जीव सुखी व्हावा,स्वर्ग यावा पृथ्वीवर!
मराठी युनिकोड फॉन्ट
ग. दि. माडगूळकर यांची ओळख | About Ga Di Madgulkar
  • महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर!.

    गदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पाने सुध्दा पुरणार नाहीत असे अष्टपैलू व्यक्तीमत्व, "ज्योतीने तेजाची आरती" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...

    गदिमांचा जन्म 'शेटफळे' या त्यांच्या आजोळी झाला तर बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थिती मध्ये 'माडगुळे' या गावात गेले.गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते,वयाच्या १६-१७ वर्षीं त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला सुरवातीला 'ब्रम्हचारी','ब्रँडीची बाटली' सारख्या काही चित्रपटात सहाय्यक नटाच्या (Extra Artist) भूमिका केल्या.भक्त दामाजी (१९४२) व पहिला पाळणा (१९४२) चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली,लोकशाहीर रामजोशी(१९४७) चित्रपटापासून खर्‍या अर्थाने 'कथा,पटकथा,संवाद,गीते ग.दि.माडगूळकर' असा ब्रॅंड निर्माण झाला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले.मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता','निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला.

    मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम,'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट','पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस','सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.

    पुढे वाचा | Read More...

     

    Gajanan Digambar Madgulkar (October 1, 1919–December 14, 1977) was an Indian poet, lyricist, play-writer, actor and orator. Ga Di Ma, as he was popularly known, was the leading name in Marathi literature and one of the great modern poets of Maharashtra.

    Ga Di Ma successfully tried his hands in many stream of literature, including poetry, stories, epics, novels, autobiographies and lyrics, marathi songs. He has almost 30 acclaimed works across these categories. The subjects covered by him in his creations are just as varied.

    Ga Di Ma was equally proficient in Hindi. He first entered the world of films in March 1938 at Kolhapur. His pen contributed to as many as 157 Marathi and 23 Hindi films. It was Ga Di Ma who penned the story and dialogue for V. Shantaram's film Do Ankhen Barah Haath, which won recognition at international film festivals.

    He is especially admired for having written Geet Ramayan, a collection of 56 verses encompassing the entire epic of Ramayana. It earned him the title of "Modern Valmiki". The music was composed by Sudhir Phadke.

  • MainBox
Invalid Request3

and