गदिमा नवनित
  • दैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा
    वनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची मराठी गाणी MP3 | Marathi Songs Of GaDiMa In Mp3
  • गदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला.

    मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता.

    This Website Contains Marathi Songs Written By Legendary Marathi Author G.D.Madgulkar In MP3 Format,His Pen Contributed To As Many As 157 Marathi And 25 Hindi Films And More Than 2000 Marathi Songs!.Songs Are Distributed In Various Categories Like Children Songs (Balgeete),Patriotic Songs (Deshbhaktipar Geete),Devotional Songs (Bhakti Geete),Emotion Poetry Songs (BhavGeete),Traditional Dance Songs (Lavanya) And Original Marathi Film Songs.
  • Box-C-2
  • अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें
    Anupamey Ho Suru Yudha He Ram Ravanache

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • नभा भेदुनी नाद चालले शंख दुंदुभींचे
    अनुपमेय हो सुरूं युद्ध हें रामरावणांचें

    सशंख राक्षसगण तो दिसला
    कष्णघनांवर बलाकमला
    मुखांतुनी शत गर्जे चपला
    रणांगणावर कोसळलें तों पाउस बाणांचे

    नाचत थय थय खिंकाळति हय
    गजगर्जित करि नादसमन्वय
    भीषणता ती जणूं नादमय
    त्या नादांतच मिळले पदरव प्लवग-राक्षसांचे

    दंत दाबुनी निज अधरांवर
    वानरताडण करिती निशाचर
    नभांत उडती सदेह वानर
    शस्त्र म्हणुन ते घाव घालिती वृक्ष-पर्वतांचे

    "जय दाशरथी, जय तारासुत"
    प्रहार करिती वानर गर्जत
    झेलित शस्‍त्रां अथवा हाणित
    भरास आलें द्वंद्व जणूं कीं महासागरांचे

    गदा, शूळ वा लागुन शक्ति
    राक्षस वानर घेती मुक्ति
    रणांत पडती अपुल्या रक्तीं
    'जय लंकाधिप' घोष घुमविती अरी वानरांचे

    द्वीप कोसळे, पडला घोडा
    वर बाणांचा सडा वांकडा
    'हाणा मारा, ठोका तोडा'
    संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे

    रणांत मरतां आनंदानें
    मांसकर्दमीं फुलतीं वदनें
    तींहि तुडविलीं जातीं चरणें
    रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे

    कलेवरावर पडे कलेवर
    ऋक्ष, निशाचर, नकळे वानर
    मरणांहुनही शौर्य भयंकर
    कैक योजनें उडुनी जाती भाग अवयवांचे

    चक्रें, चरणें, हस्त, लांगुलें
    शुंडा, ग्रीवा, शिरें, पाउलें
    पडलें तें शतखण्डित झालें
    प्रलयकाळसें अंग थरारे धरणी-गगनाचें

    द्वंद्व तरी हो कुठें कुणाचें
    काळमुखांतुन कोणी वांचे
    कुठे कुणाचें कबंध नाचे
    धुमाळींत त्या कोणा नुरलें भानच कोणाचें


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs