गदिमा नवनित
  • नजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा
    नित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा!
मराठी युनिकोड फॉन्ट
साई दरबार (सी.रामचंद्र) | Sai Darbar (C.Ramchandra)
  • गदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.

    या गीतांचे संगीतकार आहेत सी.रामचंद्र

  • Box-C-44
  • घेऊनिया पंचारती
    Gheuniya Pancharti

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर (राम गुलाम या टोपण नावाने)      Lyricist: Ga.Di.Madgulkar (As Ram Gulam)
  • संगीतकार: सी.रामचंद्र      Music Composer: C.Ramchandra
  • गायक: माणिक वर्मा      Singer: Manik Varma
  • अल्बम: साई दरबार      Album: SaiDarbar





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • घेउनिया पंचारती। करु बाबांची आरती
    उठा उठा हो बांधव। ओवाळू हा रमाधव

    करूनिया स्थिर मन। पाहूं गंभीर हे ध्यान
    कृष्णनाथा दत्तसाई। जडो चित्त तुझे पायीं


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs