गदिमा नवनित
  • चंदनी चितेत जळला चंदन,
    सुगंधे भरुन मर्त्यलोक!.
मराठी युनिकोड फॉन्ट
जोगिया (संगीत: सुरेशदा देवळे) | Jogia (Music: Suresh Devle)
  • जोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.

    गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.
  • Box-C-16
  • मेघा,जा घेऊन संदेश!
    Ja Gheuni Sandesh Megha

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुरेशदा देवळे      Music Composer: Sureshada Devle
  • गायक: उत्तरा केळकर      Singer: Uttara Kelkar
  • अल्बम: जोगिया      Album: Jogia





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • जा घेउन संदेश!
    मेघा,जा घेउन संदेश!
    उल्लंघुनिया सरिता,सागर,नानापरिचे देश

    रणांगणावर असतिल जेथे
    रणमर्दांची विजयी प्रेते
    गगनपथाने जाउन तेथे
    प्राणसख्याच्या कलेवराचा निरखुन बघ आवेश

    हाडपेर ते थेट मराठी
    हास्य अजुनही असेल ओठी
    शवे शत्रुचीं असतिल निकटी
    अंगावरती असेल अजुनी सेनापतिचा वेष

    अर्धविलग त्या ओठांवरती
    जलबंदूचे सिंचून मोती
    राजहंस तो जागव अंती
    आण उद्यांच्या सेनापतिला जनकाचा आदेश

    डोळ्यांमधली तप्त आंसवे
    थांबच देत्ये गड्या तुजसवें
    पुढे न आतां मला बोलवे
    सांग गर्भिणी खुशाल आहे पोटीचा सेनेश

    ज्योतीसाठी जगेल समई
    भिजविल तिजला रुधिरस्नेही
    वाढत जाइल ज्योत प्रत्यही
    नकाच ठेवूं आस मागची,इतुके कुशल विशेष


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs